¡Sorpréndeme!

उत्तर प्रदेशात पालिका निवडणुकीत भाजप विजेता, तर सपाचा सुफडा एकदम साफ.| Lokmat News

2021-09-13 0 Dailymotion

उत्तर प्रदेशमध्ये महानगर पालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज करण्याकडे कूच केलेय. भाजप आणि बसपामध्ये टक्कर पाहायला मिळत आहे. 16 पैकी 14 महापालिकांत बीजेपीने आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांची पहिलीच परीक्षा असल्याचे म्हटले जात आहे. या परीक्षेत ते उत्तीर्ण झाल्याची चर्चा आहे. उत्तर प्रदेशमध्ये आज 16 महानगरपालिका, 198 नगरपालिका आणि 438 नगरपंचायतीचा निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत महापौरांच्या 16 जागांचे कौल हाती आले असून भाजपाने एका जागेवर विजय मिळवला असून 10 ठिकाणी आघाडीवर आहे. मायावतींच्या बसपानेही पुनरागमन केले आहे. बसपा 5 ठिकाणी आघाडीवर आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews